Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - आजपासून IPL 2021 ला सुरूवात; हिटमॅन रोहित विरुद्ध रनमशीन विराट यांच्यात पहिली लढत.

आजपासून IPL 2021 ला सुरूवात; हिटमॅन रोहित विरुद्ध रनमशीन विराट यांच्यात पहिली लढत.

IPL 2021 mumbai indians vs royal challengers bangalore: आयपीएलच्या १४व्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होत आहे.

चेन्नई: करोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत आयपीएल टी-२० ( IPL 2021) लीगच्या १४व्या हंगामाला सुरूवात होत आहे. आयपीएल २०२१ची सुरुवात आज शुक्रवारपासून होत आहे. पहिली लढत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (mumbai indians vs royal challengers bangalore) यांच्यात होणार आहे. बेंगळुरूला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा तर बेंगळुरूचे नेतृत्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली करत आहे.

गेल्या वर्षी करोनामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली होती. तेव्हा देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नव्हता. यावर्षी देखील प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. भारतात या वर्षाच्या अखेरीस टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी आयपीएल स्पर्धा एक प्रकारची टेस्टच असेल. जर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन यशस्वीपणे केले तर आयसीसीला करोना स्थितीत देखील वर्ल्डकप सुरक्षितपणे होऊ आयोजित केला जाऊ शकतो यावर विश्वास बसेल.

या वर्षी आयपीएल स्पर्धा देशातील सहा शहरात आयोजित होणार आहे. पहिल्या टप्प्यातील २० लढती चेन्नई आणि मुंबईत होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद आणि दिल्लीत १६ लढती होतील. तर अखेरच्या २० लढती बेंगळुरू आणि कोलकाता येथे आयोजित केल्या जातील. प्लेऑफ आणि अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update