Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील; संजय काकडेंचा बॉम्बगोळा

उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील; संजय काकडेंचा बॉम्बगोळा

भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे.

पुणे:

भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे.

मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं मोठं विधान संजय काकडे यांनी केलं आहे.


त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मोठं विधान केलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो.

त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत.

त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील.

ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, असं संजय काकडे म्हणाले. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले.

चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट नेमकं कधी पृथ्वीवर पडू शकतं? जीवसृष्टीला धोका काय?

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update