Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - ऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा

ऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील करोनाची स्थितीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

यानुसार एकीकडे करोना रुग्ण कमी होत असल्याची दिलासादायक बातमी त्यांनी दिली तर लसीकरणाचा तुटवडा हा मोठा चिंतेचा प्रश्न असल्याचंही त्यांनी म्हटलं.

हायलाइट्स:
—–आता हवेतून करणार ऑक्सिजन निर्मिती
—-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
—-राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या कमी

मुंबई :

राज्यात करोनामुळे (Corona) अवस्था बिकट आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे पण त्यासाठी आरोग्य व्यवस्था मात्र अपुरी पडत आहे.

राज्यात सध्या करोनाची काय स्थिती आहे, यासंबंधी महत्त्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात फक्त ३५ हजार कोवॅक्सिन (Covacin) उपलब्ध आहेत.

अशात १ कोटीहून जास्त नागरिकांचं आतापर्यंत लसीकरण करण्यात आलं आहे.

अजूनही मोठ्या प्रमाणात लसीकरण शिल्लक असताना लसी उपलब्ध नसल्याने मोठा गोंधल उडाला आहे.

तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसींच्या पुरवठ्याअभावी १८-४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लांबणीवर पडलं असल्याची माहितीही यावेळी राजेश टोपे यांनी दिली.

ऑक्सिजनसंदर्भात महत्त्वाचा निर्णय

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

पण यासाठी आता राज्य सरकार तब्बल ३८ रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याची महत्त्वाची माहिती राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे.

हि बातमी महाराष्ट्र टाइम्स.कॉम ने दिली आहे.

संबंधित बातम्या
Maratha Reservation: केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र

Corona Cases

Corona Cases Live Update