Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - कमॉडिटी बाजारात नफावसुली ; सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण

कमॉडिटी बाजारात नफावसुली ; सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण

करोनाच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक अनिश्चितता वाढवली आहे. त्यामुळे मागील दोन सत्रात कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली होती. आज मात्र नफावसुलीने दोन्ही धातूच्या किमतीत घसरण झाली आहे.

मुंबई : तेजीत असलेल्या सोने आणि चांदीमध्ये आज शुक्रवारी नफावसुली दिसून आली आहे. मागील दोन सत्रात सोने ८०० रुपयांनी महागले होते. मात्र आज त्यात ११० रुपयांची घसरण झाली आहे. सोने सध्या ४६७०० रुपयांवर आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४६६७६ रुपये आहे. त्यात १६२ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६७०७८ रुपये असून त्यात ४२३ रुपयांची घट झाली आहे. तत्पूर्वी चांदीचा भाव ६७०२१ रुपयांपर्यंत खाली घसरला होता.

शेअर बाजाराची ठळक मुद्देः सेन्सेक्स 154 अंकांनी खाली, निफ्टी 14,850 च्या खाली खाली; धातू, वित्तीय ड्रॅग; फार्मा साठा उत्कृष्ट आहे


जागतिक बाजारात मात्र सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव १७३६.९० डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.०४ टक्के घसरण झाली. त्याआधीच्या सत्रात मात्र सोने दरात ०.१ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर चांदीचा भाव २५.१० डॉलर प्रती औंस आहे. जागतिक बाजारात सोन्याला १७६० डॉलरपर्यंत सपोर्ट आहे. ब्राझीलसह इतर देशांत करोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता कमॉडिटी विश्लेषकांनी केली आहे.

करोना संक्रमण देशात अक्राळ विक्राळ रुप धारण करताना दिसतंय. गेल्या सलग तीन दिवसांपासून देशात आढळणाऱ्या रुग्णसंख्येनं लाखांचा टप्पा पार केलेला दिसतोय. आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गुरुवारच्या २४ तासांत १ लाख ३१ हजार ८७८ करोनाबाधित रुग्णांची भर पडली तर ८०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. देशात सध्या ९ लाख ७४ हजार २३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update