Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान, सी-60 पोलीस पथकाची चकमक सुरु

गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान, सी-60 पोलीस पथकाची चकमक सुरु

पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता.

गडचिरोली :

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सी-60 पोलीस पथकाने 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची प्राथमिक माहिती आहे.

पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात चकमक सुरु आहे.

कोटरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीद्वारे पहाटे सी-60 पोलीस पथकाने ऑपरेशन सुरु केले होते.

एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर हल्ला

नक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याकडे वळवल्याचं चित्र आहे.

नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर गेल्या महिन्यात ग्रेनेड टाकला होता. त्याचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.

परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जाते. पोलीस स्टेशनपर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागत आहे.हि बातमी TV9मराठी ने दिली आहे.

Corona Cases

Corona Cases Live Update