Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - ज्या राज्यात भाजपचं सरकार तिथून कोरोनानं काढता पाय घेतला : संजय राऊत

ज्या राज्यात भाजपचं सरकार तिथून कोरोनानं काढता पाय घेतला : संजय राऊत

करोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. करोनासोबत लढण्यात राज्य सरकारला नाहीतर, केंद्राला अपयश आल्याचंही ते म्हणाले आहेत.

मुंबई : गुजरातमधील भाजप कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याचा आरोप काल नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांच्या दाव्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले की, “जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्यं कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले, असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. कारण ही संपूर्ण कोरोना विरुद्धची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे. कोरोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं पालन राज्य सरकारं करत आहेत. मला याचं आश्चर्य वाटतं, जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपाचं सरकार नाही तिच राज्यं फक्त अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे, तिथे कोरोना पळून गेला. कारण तिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?”

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update