Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - दरोड्याची केली होती मोठी तयारी..! आरोपींच्या मुसक्या आवळणारे कासेगाव पोलीस लई भारी.. !

दरोड्याची केली होती मोठी तयारी..! आरोपींच्या मुसक्या आवळणारे कासेगाव पोलीस लई भारी.. !

दरोड्याची केली होती मोठी तयारी..! आरोपींच्या मुसक्या आवळणारे कासेगाव पोलीस लई भारी.. !

नेर्ले (सांगली):

दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या टोळीला कासेगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. वाटेगावच्या वाडी भागात ही कारवाई करण्यात आली.

सूरज जयवंत चव्हाण (वय २५, रा. वाटेगाव ता. वाळवा), निरंजन ऊर्फ चॉकलेट फुलचंद मानकर (वय २१, रा. उंब्रज जि. सातारा, सध्या रा. कोडोली जि. कोल्हापूर), प्रथमेश सागर माळी (वय २१, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), सौरभ लक्ष्मण जगताप (वय २१, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर),
बापू पवार ऊर्फ रामचंद्र आनंदा वडर (वय ३०, रा. अंत्री बुद्रुक ता. शिराळा)
अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर चोरी, घरफोडी, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव पोलिस
वाटेगाव परिसरात रात्री गस्त घालत होते. या वेळी कासेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाटेगावच्या वाडी भागात काही युवक पुलाखाली संशयितरीत्या उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी जवळ जात दुचाकीची व त्यांची तपासणी केली. यात दुचाकीला कटावणी, दोन लोखंडी गज, दोन कळकाच्या काठ्या बांधलेल्या दिसून आल्या. तसेच यातील सूरज चव्हाण याच्याकडे मिरचीपूड व निरंजन मानकर याच्या कमरेला एक लोखंडी चाकू सापडला. त्यांना थांबण्याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.या वेळी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते थांबले असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी या टोळक्याला कासेगाव पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच दरोडा टाकण्याच्या
तयारीने आलो होतो, अशी कबुली त्यांनी दिली. आरोपींजवळ असणारी दुचाकी कोल्हापुरातील जुना राजवाडा ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली असल्याचे आढळून आले. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते अधिक तपास करीत आहेत. चंद्रकांत पवार, महेश गायकवाड, अमर जाधव, राहुल पाटील, दीपक घस्ते, सुनील पाटील, दिग्विजय सावंत, वैभव तोडकर, उमेश जगताप, सुनील पाटोळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.. परिसरात कोरोनाच्या स्थितीचा फायदा घेऊन घरांवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला जेरबंद केल्यामुळे कासेगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update