Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - बहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल

बहुचर्चित ‘2-डीजी’ आरोग्यसेवेत दाखल

संरक्षणमंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लॉन्चिंग

नवी दिल्ली:-
कोरोना रुग्णांवरील उपचारामध्ये ऑक्सिजनला पर्याय म्हणून वापरले जाणारे 2-डीओक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) हे पावडर स्वरुपातील औषध सोमवारी लॉन्च करण्यात आले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत या औषधाचे अनावरण करण्यात आले.

‘डीआरडीओ’ने निर्मिती केलेल्या अँटिकोविड ड्रग ‘2-डीजी’ला ‘डीसीजीआय’ने अलीकडेच आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती.

‘डीआरडीओ’ने ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’च्या सहकार्याने हे औषध तयार केले आहे. सध्या ‘2-डीजी’चे 10 हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पाण्यात विरघळवून रुग्णांसाठी देण्यात येणारे हे औषध लवकरच देशभरातील विविध रुग्णालयातही उपलब्ध होणार आहे.

डॉ. रेड्डीज लॅब जून महिन्यापासून दर आठवडय़ाला एक लाख डोसची निर्मिती करण्यास सुरुवात करणार आहे.

देशभरात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना आणि ऑक्सिजनची गरज असताना हे औषध खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते, असा दावा ‘डीआरडीओ’कडून केला जात आहे.

या औषधांमुळे रुग्णांना बराच काळ रुग्णालयात राहण्याची गरज भासणार नाही, अशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्र्यांनीही दिली आहे.

‘2-डीजी’ हे औषध गोळी, सिरप किंवा इंजेक्शन नाही तर पावडर स्वरुपात पाकिटामध्ये उपलब्ध होणार आहे. हे औषध विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि ऊर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते.

विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते. वैद्यकीय चाचण्यांच्या परिणामांनुसार या औषधाचे सेवन केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होण्यास मदत होणार आहे.हि बातमी तरुणभारत ने दिली आहे.

Corona Cases

Corona Cases Live Update