Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - बीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त ‘इतक्या’ लस

बीकेसी लसीकरण केंद्रावर नागरिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, आज मिळणार फक्त ‘इतक्या’ लस

करोनाचा वाढता धोका त्यात लसीकरणाचा तुटवडा यामुळे राज्यात मोठं तणावाचं वातावरण आहे.
भर उन्हात भल्या मोठ्या रांगा लावूनही नागरिकांचं लसीकरण होत नसल्यामुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये गोंधळ उडाला आहे.
अशीच परिस्थिती मुंबईतल्या बीकेसी केंद्रावर आहे.

मुंबई :

राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे अपुऱ्या लसींमुळे वातावरण आणखी तापल्याचं दिसून येत आहे.

आजही मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरू असल्याचं समोर येत आहे.

आताच हाती आलेल्या माहितीनुसार, बीकेसी लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचं सांगण्यात येत आहे.

शनिवारी टोकन दिलेल्या नागरिकांनी आज लसीसाठी गर्दी केली पण फक्त १ हजारच टोकन वाटणार असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला.

भर उन्हात मोठ्या रांगा लावूनही लसीकरण होत नसल्यामुळे नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची केली.

शनिवारी टोकन दिलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

पण लसीकरणाचा तुटवडा असल्यामुळे बीकेसी केंद्रावर फक्त एक हजार लसी दिल्या जाणार आहेत.

यावेळी टोकनचा आता काही फायदा होणार नसल्याने नागरिक चांगलेच संतापले आहे. यावेळी अनेकांनी राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update