Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना?; राज्य सरकारच्या हालचाली सुरू

मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना?; राज्य सरकारच्या हालचाली सुरू

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबई: 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

आज आरक्षण उपसमितीची बैठक होणार असून त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

विरोधकांनीही मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर नव्याने मागासवर्घीय आयोग स्थापन करण्याचा सल्ला प्रशासनाला देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे.

त्यात नव्या मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update