Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईः करोनाचे थैमान रोखण्यासाठी राज्यभर कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यत येत नसल्यानं आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. यावेळी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत गांभीर्यानं विचार केला जाणार असल्याची चर्चा आहे.

या बैठकीत महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. (लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी पेज रिफ्रेश करा)

– महिन्याला १ लाख रेमडेसिवीर लागतीलः राजेश टोपे यांनी दिली माहिती

– ५० हजार रेमडेसिवीरची गरजः राजेश टोपे

– मृत्यूदर थोपवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करावाः बाळासाहेब थोरात

– संपूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईलः देवेंद्र फडणवीस

– चाचणी केल्यानंतर अहवाल तात्काळ मिळावे: देवेंद्र फडणवीस

– राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा; रेमडेसिवीर कसं उपलब्ध करता येईल याबाबत राज्य सरकारनं हस्तक्षेप करावाः देवेंद्र फडणवीस

– लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय दिसत नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

– रुग्ण वाढत आहेत त्यामुळं निर्णय घेण्याची वेळः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

– ‘१५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो’

– करोनाची साखळी तोडण्यासाठी आता लॉकडाऊन हाच पर्याय- मुख्यमंत्री

– कडक लॉकडाऊनची गरज अन्यथा १५ दिवसांनंतर परिस्थीती गंभीरः मुख्य सचिव

– देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची बैठकीसाठी हजेरी

– राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील बैठकीला उपस्थित

– मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक सुरु

– रुग्णसंख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, त्यामुळं लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार. या बैठकीत विरोधी पक्षाचेही मत विचारात घेतले जाणारः विजय वडेट्टीवार

– करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कटू निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाहीः बाळासाहेब थोरात

– व्यापाऱ्यांच्या भूमिकेबाबत आज बैठकीत चर्चा होणारः अजित पवार

– सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

– राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांचा लॉकडाउनबाबत चर्चा होणार असल्याची माहिती..

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update