Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - सांगली जिल्ह्यात उद्यापासून आठ दिवस लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

सांगली जिल्ह्यात उद्यापासून आठ दिवस लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

सांगली जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कलक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली :

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू असतानाच आता सांगलीत हे निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहे.

खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनीच जिल्ह्यात आठ दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन दरम्यान काय सुरु आणि काय बंद राहणार हे जाणून घ्या.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा पाहता ही साखळी तोडण्यासाठीच हा निर्णय घेतला जात असल्याचं म्हणत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Gokul Election Result | गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? सतेज पाटील वि. महाडिक गटात चुरस

काय आहेत निर्बंध?

काय सुरु राहणार?

सांगली जिल्ह्यात बँका, हॉटेलमधून पार्सल, घरपोच सेवा सुरु राहणार
अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांनाच पेट्रोल, डिझेल मिळणार.
उद्योग सुरु राहणार.
शिवभोजन थाळी पार्सल सेवा सुरू राहणार

काय बंद राहणार?

जिल्हाअंतर्गत एस.टी.बंद,
हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार
आस्थापना सर्व बंद
किराणा दुकान बंद
किरकोळ विक्रते बंद
दारू दुकाने बंद
फेरीवाले बंद
मटण, चिकन विक्री बंद
7 ते 9 दूध विक्री सुरू राहणार
बार मधील पार्सल सेवा बंद

दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील हे 1 मे पासून सांगलीतच असून, परिस्थितीचा अतिशय जवळून आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींवर ते लक्ष ठेवून आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही जयंत पाटील यांनी दिले.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update