Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - हरल्या म्हणून काय झाले, ममतादीदींना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार: संजय राऊत

हरल्या म्हणून काय झाले, ममतादीदींना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार: संजय राऊत

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
हरल्या म्हणून काय झाले, ममतादीदींना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार: संजय राऊत

मुंबई:

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, ममता बॅनर्जी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.

बंगालमध्ये विधान परिषद नाही, त्यामुळे त्या शपथ घेऊ शकत नाहीत, असं विरोधकांकडून सांगितल्या जात आहे. त्यावर हरल्या म्हणून काय झालं.

ममता दीदींना बंगालच्या जनतेने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा आहेत.

आम्ही त्यांचा आदर करतो. हा विजय केवळ आणि केवल त्यांचा आहे. त्यांच्या समोर बडे नेते होते. त्या सर्वांना त्यांनी भूईसपाट केलं आहे.

त्यामुळे हा निव्वळ त्यांचा विजय असून आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

मोरारजी ते स्मृती ईराणींनी शपथ घेतली

यापूर्वी लोकसभेला पराभूत झालेल्यांना मंत्रिमंडळात शपथ देण्यात आली होती. स्मृती ईराणी, शिवराज पाटील यांनी शपथ घेतली होती.

मोरारजी देसाई विधानसभेला पराभूत झाले होते. परंतु त्यांनीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे या किरकोळ गोष्टी उभ्या करण्यात अर्थ नाही.

ममता बॅनर्जी या नेत्या आहेत. त्या नंदीग्राममधून हरल्या असल्या तरी बंगालच्या जनतेने त्यांना स्वीकारलं आहे. त्यामुळे त्या शपथ घेऊ शकतात, असंही ते म्हणाले.

सांगली जिल्ह्यात उद्यापासून आठ दिवस लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

ममता राज्य नाही

बंगालमधील हिंसा चिंताजनक आहे. परंतु, तिथे सध्या ममता बॅनर्जी यांचं राज्य नाही. बंगालच्या जनतेने शांत राहावं. कोरोनाचं संकट आहे.
या संकटाचा मुकाबला बंगालच्या जनतेने केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update