Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - Corona Vaccine: येत्या चार महिन्यांत सीरम, भारत बायोटेक लसीच्या उत्पादनात वाढ करणार

Corona Vaccine: येत्या चार महिन्यांत सीरम, भारत बायोटेक लसीच्या उत्पादनात वाढ करणार

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयानं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडून आपला येत्या चार

महिन्यांची उत्पादन योजना मागितली होती.

हायलाइट्स:

 • सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून उत्पादन योजना
 • येत्या चार महिन्यांत उत्पादनात वाढ करणार
 • दर महिन्याला ‘सीरम’ १० कोटी तर ‘भारत बायोटेक’ ७.८ कोटी डोस बनवणार
 • काही राज्यांचा करोना लसीच्या खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय पर्याय निवडण्याचा निर्णय
 • नवी दिल्ली :

  देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान अनेक राज्यांना लस मिळवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. लसीच्या अपुऱ्या उत्पादनामुळे आणि पुरवठ्यामुळे हे संकट देशासमोर उभं आहे. याच दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी आपल्या पुढल्या चार महिन्यांची उत्पादन योजना केंद्राला सोपवली आहे.

  अधिक वाचा : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर

  बुधवारी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापर्यंत ‘सीरम इन्स्टिट्यूटन’नं प्रत्येक महिन्याला १० कोटी तर ‘भारत बायोटेक’नं ७.८ कोटी लसीचे डोस बनवण्यासाठी उत्पादनक्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

  केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयानं दोन्ही कंपन्यांकडून जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी त्यांची उत्पादन योजना मागितली होती. त्यावर दोन्ही कंपन्यांनी हे आश्वासन दिलंय. हि बातमी महाराष्ट्र टाइम्स.कॉम दिली आहे.

  Corona Cases

  Corona Cases Live Update