Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - Coronavirus Crisis करोना संकटाशी झुंज; भारतासमोर ‘हा’ एकच पर्याय !

Coronavirus Crisis करोना संकटाशी झुंज; भारतासमोर ‘हा’ एकच पर्याय !

Anthony Fauci India Coronavirus Vaccination: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार अँथनी फाउची यांनी भारतातील करोना संकटा पुन्हा एकदा भाष्य केले आहे.

वॉशिंग्टन:

भारतात करोना महासाथीचे थैमान सुरू आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

भारताला करोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याचे अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ डॉ. फाउची यांनी म्हटले.

डॉ. फाउची हे अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार देखील आहेत. भारतातील रुग्णालयात ऑक्सिजन, पीपीई किट्स आणि अन्य वैद्यकीय सामग्री, उपकरणांचा तुटवडा असून अमेरिकेने मदतीसाठी पुढे यायला हवे असेही त्यांनी म्हटले.

फाउची यांनी सांगितले की, करोनाच्या संकटाशी दोन हात करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोविड-विरोधी लशीचे उत्पादन वाढवण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले.

एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत फाउची यांनी सांगितले की, या महासाथीच्या आजाराचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्याची आवश्यकता आहे.

वाचा: ‘कोरोनाची तिसरी लाट आणि फॅमिली डॉक्टरचं महत्व’; मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले?

फाउची यांनी सांगितले की, भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे.

त्यांना फक्त देशातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील संसाधने उपलब्ध होत आहेत.

भारताला लस निर्मितीसाठी मदत पुरवावी लागेल अथवा भारताला मदत म्हणून लस पुरवठा करायला हवा.

भारतात तात्काळ एक अस्थायी रुग्णालय तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले.

रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वाऱ्यावर सोडू शकत नाही.

भारतात ऑक्सिजन मिळणेही कठीण झाले आहे. त्यांनी करोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनची आवश्यकता असल्याचे म्हटले.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update