Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - Cyclone Tauktae Tracker And Live Updates | 410 जण अरब समुद्रात अडकले

Cyclone Tauktae Tracker And Live Updates | 410 जण अरब समुद्रात अडकले

भीषण तौक्ते चक्रीवादळ हे सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर धडकलं. यादरम्यान 185 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहात होते.

तर महाराष्ट्रासह मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला.

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे.

या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आणखी 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

18 MAY 2021 09:18 AM (IST)
Cyclone Tauktae Live Ratnagiri | चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान
रत्नागिरी – चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान

रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग साडेचार हजाराहून अधिक घरांचे नुकसान

अनेक भागातील वीज पुरवठा अद्याप खंडित

नुकसानीचा आकडा काही कोटींमध्ये

पंचनामे करण्यास आजपासून सुरुवात

काजू आणि आंबा बागा तिचे मोठे नुकसान

18 MAY 2021 09:17 AM (IST)
Cyclone Tauktae Live Vasai Virar | वसई-विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी
वसई-विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

सुसाट चा वारा आणि जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते झाले जलमय.. रस्त्यावर साचले गुडगाभर पाणी.. संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित

नालासोपारा पूर्व आचोले रोड, सेंत्रालपार्क रोड, अल्कापुरी, वसई एव्हरशाईन, विरार विवा कॉलेज रोडवर पाणीच पाणी

रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची मोठी कसरत सुरू.. दिवसभर असेच पाऊस राहिले तर शहरात माजाणार हाहाकार

नालासोपारा पूर्व आचोले रोडवरील सकाळी 8 वाजताची ही दृश्य

18 MAY 2021 09:00 AM (IST)
Cyclone Tauktae Live Gujrat |

410 जण अरब समुद्रात अडकले तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि गुजरातमधील दोन लाखाहून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे,

तर यादरम्यान दोन नावे किनाऱ्यापासून दूर अरब समुद्रात गेली, या दोन नावेवर 410 लोक अडकल्याची माहिती आहे

18 MAY 2021 08:56 AM (IST)
Cyclone Tauktae Live | यूपी, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात दोन तासात पावसाची शक्यता

येत्या दोन तासांत उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हि बातमी TV9मराठी ने दिली आहे.

Corona Cases

Corona Cases Live Update