Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - Gokul Election Result | गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? सतेज पाटील वि. महाडिक गटात चुरस

Gokul Election Result | गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? सतेज पाटील वि. महाडिक गटात चुरस

सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान दिलं आहे.

कोल्हापूर :

बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी आज होणार गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? आहे. गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतकं झालं आहे.

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात होत असून दुपारपर्यंत मतदारांचा कौल कळणार आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान दिलं आहे.

गोकुळचं राजकारण कसं रंगलं?

गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केलीय.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली. मात्र अवघ्या चार दिवसात त्यात फूट पडली.

आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Coronavirus Update : राहुल गांधींची संपूर्ण लॉकडाऊनची मागणीgokul

गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?

दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक

रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन

मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी

गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल

गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update