Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - JEE Main 2021 April Admit Card:जेईई मेन एप्रिल सत्राचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार, jeemain nta nic in वरुन डाऊनलोड करा.

JEE Main 2021 April Admit Card:जेईई मेन एप्रिल सत्राचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार, jeemain nta nic in वरुन डाऊनलोड करा.

JEE Main 2021 April Admit Card :जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राचे अ‌ॅडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राचे अ‌ॅडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. एप्रिल सत्राच्या जेईई मेन परीक्षेला बसलेले विद्यार्थी jeemain.nta.nic.in या वेबसाईटवरुन अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. जेईई मेन 2021 एप्रिल सत्राच्या परीक्षेची तारीख यापूर्वीच जाहीर केली गेली आहे. ही परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. (JEE Main 2021 April Admit Card to be release soon at jeemain nta nic in click here how to download)

एप्रिल सत्रामध्ये एकाच पेपरचे आयोजन

जेईई मेन एप्रिल सत्रामध्ये फक्त एका पेपरचे आयोजन केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीई / बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. ते अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन पेपर 1 ची परीक्षा देतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माहितीनुसार यावेळी जेईई मेन पेपर 2 (बी. आर्क) आणि (बी.प्लॅनिंग) चं आयोजन एप्रिल सत्रामध्ये केलं जाणार नाही.

विद्यार्थी खालील प्रकारे अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात

स्टेप 1: सर्वप्रथम jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
स्टेप 2: आता अॅडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: येथे आपल्याला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.
स्टेप 4: यानंतर, आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: आता प्रवेशपत्र डाऊनलोड करा.
स्टेप 6: प्रवेश पत्राची प्रिंट काढा.

जेईई मेन मार्च सत्राचा निकाल 24 मार्चला जाहीर

जेईई मेन मार्च सत्राचा निकाल 24 मार्चला जाहीर झाला होता. यामध्ये 13 विद्यार्थ्यांनी 100 परफेक्ट एनटीए स्कोर प्राप्त केला होता. दिल्लीची काव्या चोप्रा आणि महाराष्ट्राची गार्गी मकरंद बक्षी यांनी देखील 100 परफेक्ट स्कोर केला होता. मार्च सत्रासाठी एकूण 6 लाख 19 हजार 368 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Source link.

Corona Cases

Corona Cases Live Update