Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश.

JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश.

JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलं आहे.

JEE Main 2021 April Postponed नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांकडून परीक्षा स्थगित करण्याची मागणी

भारतात कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या लाटेमुळे आता दररोज 2 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे सीबीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. देशातील इतर बोर्डांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्त्यांनी केली होती. जेईई मेनच्या विद्यार्थ्यांकडून #POSTPONEJEEMains2021 ही मोहिम राबवली गेली होती. परीक्षा लांबणीवर टाकून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update