Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - Maratha Reservation Verdict LIVE : राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Maratha Reservation Verdict LIVE : राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

Maratha Reservation Verdict LIVE : अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

10:44 AM IST | 05 MAY 2021
Maratha Reservation Verdict LIVE : मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे.

10:42 AM IST | 05 MAY 2021
Maratha Reservation Verdict LIVE : सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
Maratha Reservation Verdict LIVE : गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे

10:34 AM IST | 05 MAY 2021
Maratha Reservation Verdict LIVE : मराठा आरक्षणाच्या सुनावणीला सुरुवात
Maratha Reservation Verdict LIVE : बहुप्रतिक्षित मराठा आरक्षणाच्या सुनावणीला सुरुवात. सलग सुनावणी सुरु

10:28 AM IST | 05 MAY 2021
Maratha Reservation Verdict LIVE : थोड्याच वेळात मराठा आरक्षणाच्या सुनावणीला सुरुवात
Maratha Reservation Verdict LIVE : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास मराठा आरक्षण प्रकरणी राखीव असलेला निकाल सुनावणार आहे. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे.

10:29 AM IST | 05 MAY 2021
Maratha Reservation Verdict LIVE मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात निकाल; अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष
Maratha Reservation Verdict LIVE सुप्रीम कोर्टात अवघ्या काही क्षणांत मराठा आरक्षण प्रकरणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

10:30 AM IST | 05 MAY 2021
Maratha Reservation Verdict LIVE : सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
Maratha Reservation Verdict LIVE : मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली. 1992 मधील इंदिरा साहनी खटल्याप्रकरणी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे की, नाही आणि इंदिरा साहनी खटल्याचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याची गरज आहे की नाही, याचं परीक्षण करणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update