Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - NASA mission Mars मिशन मंगळ: नासाच्या हेलिकॉप्टरचा आवाज ऐकलात का?

NASA mission Mars मिशन मंगळ: नासाच्या हेलिकॉप्टरचा आवाज ऐकलात का?

नासाच्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेत अनेक गोष्टी समोर येत आहेत. नासाकडून मंगळ मोहिमेशी निगडीत अनेक गोष्टी लोकांना सोशल मीडियाद्वारे सांगण्यात येतात.
नासाने मंगळ मोहिमेसाठी Ingenuity helicopter चे उड्डाण केले. त्याचा आवाज प्रसारीत केला आहे.

वॉशिंग्टन:

मंगळाच्या पृष्ठभागावर हेलिकॉप्टर उडवण्याच्या यशस्वी प्रयोगाची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर, ‘नासा’ने या हेलिकॉप्टरचा आवाजही प्रसारित केला आहे. पृष्ठभागापासून अडीचशे फूट उंचीपर्यंत उडणाऱ्या या हेलिकॉप्टरचा बारीक आवाज ऐकता येणार आहे.

‘नासा’च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने हा आवाज प्रसारित केला आहे. त्याआधी, या हेलिकॉप्टरने पाचव्यांदा चाचणी उड्डाण केले.

यामध्ये हे हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर नव्या ठिकाणी उतरले. गेल्या आठवड्यातील चौथ्या उड्डाणावेळचा आवाज प्रसारित करण्यात आला आहे.

यामध्ये हेलिकॉप्टरची पाती प्रतिमिनिट २५०० या वेगाने फिरत होती. मात्र, चार पौंड वजनाचे हे हेलिकॉप्टर मायक्रोफोनपासून २६० फूट उंचीवर उडत असल्यामुळे, त्याचा आवाज अतिशय बारीक ऐकू येत आहे.

एखादा डास किंवा किटक उडत असताना येणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आवाज आहे.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update