Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - PBKS vs KKR Live Score, IPL 2021 : पंजाबचे किंग्स विरुद्ध कोलकाताचे नाईट रायडर्स आमनेसामने

PBKS vs KKR Live Score, IPL 2021 : पंजाबचे किंग्स विरुद्ध कोलकाताचे नाईट रायडर्स आमनेसामने

आयपीएल (IPL 2021) स्पर्धेत आज पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे दोन संघ भिडणार आहेत.

अहमदाबाद :

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेतील 20 वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे दोन संघ भिडणार आहेत.

कोलकात्याचा संघ या स्पर्धेतील एका विजयासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. तर दोन सामन्यांमधील विजयांसह पंजाबचा संघ पाचव्या स्थानी आहे. आजचा सामना जिंकत पराभवाची मालिका खंडित करण्याचा निर्धार कोलकात्याच्या नाईट रायडर्सनी केला आहे.

तर स्पर्धेतील तिसऱ्या विजयाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून के. एल. राहुलचे किंग्स आज मैदानातर उतरतील.

कोलकात्याचं पारडं जड

कोलकाता आणि पंजाबचे संघ या आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या 27 पैकी 18 सामने कोलकात्याने जिंकले आहेत, तर 9 सामन्यांमध्ये पंजाबला विजय मिळवता आला आहे.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update