Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा बुटांमुळे पुन्हा एकदा चर्चेत, चाहत्यांकडून कौतुक.

Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा बुटांमुळे पुन्हा एकदा चर्चेत, चाहत्यांकडून कौतुक.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (hitman rohit shrma) कोलकाता विरुद्धच्या सामन्यात बुटाद्वारे पर्यावरणचा (give message about for environment) बचाव करण्याचा संदेश दिला.

चेन्नई : मुंबई इंडियन्सचा ((mumbai indians) कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा बुटांमुळे चर्चेत आला आहे. कोलकाता विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर रोहितने अनेकांची मनं जिंकली आहेत. या सामन्यात रोहितने वन्यजीव आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासंबंधात एक खास संदेश दिला. रोहितने या सामन्यात प्लास्टिक मुक्त समुद्रासाठी आणि त्याबाबत जनमाणसात जागृती करण्यासाठी मोठा कासव असलेलं बुट घातले होते. रोहितने याबाबतचं ट्विट केलं आहे. रोहितच्या निसर्गाप्रती असलेल्या प्रेमाबाबत त्याचं प्राणीमित्रांकडून कौतुक केलं जात आहे. (mumbai indians vs kolkata knight riders ipl 2021 hitman rohit shrma give message about for environment).

दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढतेय. या प्रदुषणाचा थेट परिणाम हा निसर्गावर पर्यायाने जैवविविधतेवर होत आहे. यामुळे अनेक प्राणी हे नामशेष होत आहेत. लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने रोहित हे सर्व प्रयोग करतोय. रोहितने याआधीही अनेकदा जनजागृती केली आहे.

सलामीच्या सामन्यातही रोहितकडून संदेश
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील सलामीचा सामना मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यातही रोहितने घातलेल्या बुटांवर एक शिंगी गेंड्याचं चित्र होतं. सध्या एक शिंगी गेंड्यांची प्रजाती लुप्त होत चालली आहे. ही प्रजाती नष्ट झाली तर कदाचित निसर्गातील परिसंस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. रोहितने यामुळे गेंड्यांच्या संरक्षणासाठी आणि जनजागृती करण्यासाठी गेंड्यांचे चित्र असलेले बुट घातले होते. या बुटांवर ‘सेव्ह द रायनो’ म्हणजेच गेंड्यांना वाचवा असा संदेशही लिहिण्यात आला होता.

Source link

Corona Cases

Corona Cases Live Update